महेश गुरव:भाजपा युवा मोर्चा आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न…
⚡कणकवली ता.१६-: आशिये येथे आयोजित भाजपा युवा मोर्चा पुरस्कृत व रोहित ठाकुर यांच्या पुढाकाराने झालेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बोलताना आशिये गावचे सरपंच महेश गुरव यांनी सर्व खेळाडू आणि आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत प्रथम विजेता संघ यश इलेव्हन संघ आशिये तर उपविजेता दत्तकृपा बांधकरवाडी,कणकवली संघ ठरला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अशा क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना आपली प्रतिमा दाखवण्याची संधी मिळते. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना आणि मैत्रीची भावना वाढीस लागते. गावात अशा उपक्रमांचे आयोजन होत राहणे ही अभिमानाची बाब असून यामुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळते.
सरपंच महेश गुरव यांनी या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल रोहित ठाकुर व भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच भविष्यातही गावाच्या विकासासाठी आणि युवकांच्या प्रोत्साहनासाठी अशा उपक्रमांना नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर आशिये सरपंच महेश गुरव,माजी सरपंच शंकर गुरव,पत्रकार संजय बाणे,सामाजिक कार्यकर्ते समीर ठाकुर, निलेश ठाकूर,अमित ठाकुर,ऱोहीत ठाकूर,राजेश ठाकूर, अविराज मराठे हे उपस्थित होते.कणकवली शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रताप भोसले, कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पप्पू पुजारे, सागर राणे व तसेच आशिये भाजप कार्यकर्ते यांचेही सहकार्य लाभले.
