कणकवली पंचायत समिती सभापती – उपसभापती पदाची आज निवड…

हर्षदा वाळके व राजेश उर्फ सोनू सावंत यांची नावे आघाडीवर..

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज होणार असून या निवडीसाठी भाजपाकडून नावे निश्चित झाली आहेत. सभापती पदासाठी नांदगाव पंचायत समितीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या हर्षदा वाळके यांचे नाव तर उपसभापती पदासाठी वरवडे पंचायत समितीचे सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांचे नाव निश्चित झाले आहे. काही वेळातच भाजपाकडून या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

कणकवली पंचायत समितीमध्ये १६ पैकी सर्व सदस्य हे भाजपा-शिवसेना महायुतीचे असल्याने सभापती व उपसभापती पदाच्या निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हर्षदा वाळके यांनी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले असून राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या पत्नीही यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. हे दोन्ही संभाव्य पदाधिकारी कट्टर राणे समर्थक मानले जात असून पंचायत समितीच्या कारभाराची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याचेही समजते.

दरम्यान, सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकृतीची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी ठेवण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते ३.१५ या वेळेत वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असून ३.१६ ते ३.३० या वेळेत नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत राहणार आहे. त्यानंतर ३.३१ ते ३.४५ या वेळेत अंतिम वैध उमेदवारांची नावे घोषित केली जातील. दुपारी ३.४५ पासून मतदान प्रक्रिया होऊन त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. सभापती पदाची निवड झाल्यानंतर तत्काळ उपसभापती पदाची निवडणूकही घेण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page