⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या तळवडे येथील पंचायत समिती सदस्या सुस्मिता सुधाकर जाधव यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.
नामनिर्देशन सादर करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शिवसेना गटनेते शरद धाऊसकर, भाजप गटनेते महेश धुरी तसेच शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
याशिवाय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी जाधव यांना शुभेच्छा दिल्या.सभापती पदासाठी सुस्मिता जाधव यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या विजयाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
