Headlines

आडेली गावातील ऐतिहासिक ‘शिमगोत्सव’ मंगलमय वातावरणात…

ऐतिहासिक “घोडेमोडणी” उत्सवास झालीय भाविकांची गर्दी..

⚡वेंगुर्ला ता.०६-: संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील ऐतिहासिक ‘ शिमगोत्सव’ मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या उत्स्फूर्त, अलोट गर्दीत संपन्न झाला. होळी पौर्णिमा संपन्न झाल्यानंतर प्रमुख धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली. ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर मंदिर व श्री देव चव्हाटा मंदिर येथे देवहोळी व गावहोळी घालण्यात आली. तदनंतर शेवटच्या दोन दिवसात घरोघरी देवतांचे आगमन, ऐतिहासिक “रोम्बाट ” परंपरेने या उत्सवात रंगत आणली. शुक्रवारी सायंकाळी श्री देव चव्हाटा मंदिर येथे मांडावर देवतेस नारळ ठेवण्यासाठी, नवस फेडणे साठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.उल्लेखनीय म्हणजे या उत्सवासाठी मुंबईकर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यानंतर गावकरी यांचे मांडावर विशेष ‘खेळे’, धुळवड व त्यानंतर ऐतिहासिक ” घोडेमोडणी “उत्सव दिमाखात संपन्न होत आहे. आडेलीचे प्रमुख धर्णे मानकरी, गावकर व ग्रामस्थ यांच्या सुयोग्य नियोजनात शिमगोत्सव व घोडेमोडणी उत्सव मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे. काही दिवसानंतर श्री देव रायकर देवस्थान येथे वार्षिक धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

You cannot copy content of this page