सानिका मदने:इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून गरजू महिलांना इस्त्री वाटप:जागतिक महिला दिनानिमित्त समाजपयोगी उपक्रम..
कुडाळ : इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणारा सक्षम स्त्री सक्षम भारत उपक्रम ग्रामीण भागात इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या माध्यमातून पोहचवणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून PDC डॉ. सायली प्रभू यांच्या शुभहस्ते सौ. कुडाळकर यांना इस्त्री वाटप करण्यात आले.
यावेळी कुडाळ इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने,सौ संजना काणेकर, सौ चित्रा बोभाटे, सौ अनघा केसरकर, सौ ऋतुजा परब, सौ स्वप्नाली साळगावकर, सौ शरयु अंधारी, सौ पल्लवी बोभाटे, सौ आरोही माने, सौ राजश्री सावंत, डाॅ उज्वला सावंत, सौ जान्हवी रावराणे आदी इनरव्हील सदस्या उपस्थित होत्या.
इनरव्हील क्लब ऑफ कुडाळने सन 2025-26 या वर्षात दर्जेदार उपक्रम यशस्वी करत इनरव्हील डिस्ट्रिकट 317 मध्ये इनरव्हील क्लब ऑफ कुडाळची कामगिरी दमदार झालेबाबत कुडाळ इनरव्हीलचे कौतुक करत असल्याचे माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू यांनी सांगितले.
या प्रोजेक्टसाठी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या खजिनदार सौ. गीतांजली कांदळगावकर यांनी मोलाचे योगदान दिले. तर सौ. चित्रा बोभाटे यांनी विशेष सहकार्य केले.
