नेरूर मध्ये उद्या (७) महसूल शिबिराचे आयोजन…

नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी:महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी..

कुडाळ : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत वालावल मंडळ स्तरावर उद्या शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ठिक १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेरूर देऊळवाडा सभागृह येथे महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, ‘सनद” प्रक्रियेची माहिती. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे (संजय गांधी योजना) लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यासाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पटटे वाटप व ई- मोजणी अर्ज, Agristack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग 2 चे वर्ग 1 करणेबाबतची प्रकरणे, तसेच आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड वरील नाव कमी-जास्त करणे तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची कामे येणार करण्यात आहेत. तसेच संबंधित सेवा विषयक अर्जही स्विकारण्यात येणार आहेत.
कुडाळ तालुक्यातील वालावल मंडळातर्गत गावातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या दिवशी आयोजित केलेल्या शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page