सावंतवाडी नगरपरिषदतर्फे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समिती मार्फत दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेचे बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहात हे कार्यक्रम होणार असून सकाळी ९ वा. पाककला स्पर्धा, गोड पदार्थ व तिखट पदार्थ (आकर्षक पारितोषिके), सकाळी १० वा. महिला व मुलांचा सत्कार सोहळा, सकाळी ११ वा. महिला व युवतींना स्वरंरक्षण विषयक मार्गदर्शन, सकाळी ११.३० वा. फनी गेम्स व
दुपारी १२.३० वा. बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोंसले, प्रभारी नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, सभापती मोहिनी मडगांवकर, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, प्रतिक बांदेकर, नगरसेवक विणा जाधव, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या डोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, ॲड. निता सावंत-कविटकर, संजू परब, बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, दुर्गेश सुर्याजी, देवेंद्र टेमकर, तौकीर शेख, ॲड. सिध्दार्थ भांबुरे तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्याकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page