सबनीसवाड्यात भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी स्वखर्चाने निर्बीजीकरण…

निशांत तोरस्कर व डॉ. चंद्रशेखर गवस यांचा पुढाकार: नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक…

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा परिसरात भटक्या श्वानांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर निशांत तोरसकर व त्यांचे सहकारी डॉ. चंद्रशेखर गवस यांनी प्रशासनाची वाट न पाहता समाजहिताच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण “स्टेरिलायझेशन” स्वखर्चाने करण्याचा तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र शेल्टर होम उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमामुळे भटक्या श्वानांची वाढती संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच शेल्टर होममुळे कुत्र्यांची योग्य देखभाल व आरोग्य तपासणीही नियमितपणे होऊ शकणार आहे.
समाजातील समस्या ओळखून त्यावर स्वयंस्फूर्तीने उपाययोजना करण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page