प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी आगारातील चालक बाबली तुळसकर यांचा सन्मान…

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्याकडून अभिनंदन; सावंतवाडी आगारात सन्मान सोहळा संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२६-: राज्य परिवहन महामंडळातील अपघातविरहित व सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ‘सुरक्षित सेवा बिल्ला’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार सावंतवाडी आगारातील चालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांना १५ वर्षांची अपघातमुक्त सेवा पूर्ण केल्याबद्दल सावंतवाडी आगारात सुरक्षित सेवा बिल्ला व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.हा सन्मान आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी चालक तुळसकर यांचे विशेष अभिनंदन केले.

चालक बाबली तुळसकर हे सावंतवाडी आगारात चालक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने बजावली आहे. यापूर्वीही १५ ऑगस्ट २०१६ रोजी उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा तत्कालीन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. तसेच ते सावंतवाडी आगारात अनेक वर्षे कर्मचारी प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत.

कार्यक्रमास सहाय्यक वाहतूक नियंत्रक प्रांजल धूरी, रेषा सावंत, वनमाने मॅडम, मनस्वी नाईक, आर. आर. राणे, अरुण सरदेसाई, बाबू माणगावकर, विद्या नाटेकर, अरुण पवार तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page