प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात अमलात आणण्यात आले आणि आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. यावेळी समाज मंदिर परिसरातील इतर रहिवासी देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page