दादा नाईक यांची वादळी खेळी ; मालिकाविराचा पटकाविला सन्मान…
⚡सावंतवाडी ता.१९-:
नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली पाक्याचीवाडी आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग पर्व ८ चा महाअंतिम सामन्यात दादा नाईक या खेळाडूच्या तडाखेबाज फलदांजीच्या जोरावर २४ बाॅलमध्ये ८५ धावाचे कठीण आव्हान पुर्ण करत भवानी स्पोर्ट्स संघ महाविजेता ठरला तर उपविजेता संघ ठरला तो राॅयल स्ट्रायकर्स सोनुर्ली. दोन्ही संघाना मान्यवराच्या उपस्थितीत रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
नवयुवक कला क्रीडा मंडळ गेली आठ वर्ष सोनुर्ली प्रीमियर लीग चे यशस्वीरित्या आयोजन करत आहे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने या लीगचे आयोजन करण्यात आले होते. आझाद मैदानावर पार पडलेल्या या लीगसाठी तब्बल सहा संघानी सहभाग दर्शविला होता. महाअंतिम सामना भवानी स्पोर्ट आणि रॉयल स्ट्रायकर्स सोनुर्ली या दोन संघांमध्ये रंगला नाणेफेक जिंकून भवानी स्पोर्ट्स संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली राॅयल स्ट्रायकर्स संघाच्या आयकॉन खेळाडू असलेल्या राजाराम गवस याने भवानी स्पोर्ट संघाच्या गोलंदाजाच्या वर तुटून पडत स्वतःच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला २४ चेंडूत ८४ धावा पर्यंत नेत भवानी स्पोर्ट्स संघाला २४ चेंडू मध्ये ८५ धावाचे कठीण असे आव्हान उभे केले.
समोर मोठा लक्ष असताना सुद्धा भवानी स्पोर्ट संघ एका आत्मविश्वासाने मैदानात उतरला, यावेळी आयकॉन खेळाडू असलेल्या पाडलोस येथील दादा नाईक यांनी संयमी आणि तितकीच तडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजया नजिक नेले. त्याला न्हावेली येथील अजय पार्सेकर सारख्या अष्टपैलू खेळाडूंची ही तितकीच साथ लाभली. एक चेंडू आणि तीन धावा अशा समीकरणापर्यंत पोहोचलेल्या रोमांचक सामन्यात अखेरच्या चेंडूवर तीन धावा काढत भवानी स्पोर्ट्स संघाने रोमहर्षक विजय संपादीत केला.
अतिम सामन्यानंतर विजेत्या आणि उपयोजित या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या एकूणच लीगचा उत्कृष्ट फंलदाज म्हणून राजाराम गवस तर मालिकावीर म्हणून दादा नाईक यांना गौरवण्यात आले. एकूण दोन दिवस चाललेली ही स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली.
