माघी गणेश जयंतीनिमित्त इन्सुलीत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: इन्सुली खामदेव नाका येथील गणेश मंदिर, इन्सुली येथे ‘नवदूर्गा कला क्रीडा मंडळ’ आणि समस्त कुडवटेंब ग्रामस्थ यांच्या वतीने यंदाचा ‘माघी गणेश जयंती’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २१ जानेवारी आणि गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
​या निमित्ताने बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता पूजा अर्चा आणि ब्राह्मण भोजनाने होईल. ​गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी
​पहाटे ५.०० वा.सत्यविनायक पूजा,​सकाळी ८.०० वा.श्रींची पूजा, महाआरती आणि तीर्थप्रसाद,​दुपारी १.०० वा महाप्रसाद,​सायंकाळी भजनाचा कार्यक्रम या निमित्ताने गुरुवार रात्री ९.०० वाजता ‘पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा ‘महाकाली लिंग स्थापना’ हा भव्य पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
​या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवदूर्गा कला क्रीडा मंडळ व समस्त कुडवटेंब ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page