मालवण तालुका काँग्रेस कमिटीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक…

⚡मालवण ता.१४-:
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व निवडणूक नियोजनासाठी मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी येथे सकाळी ११ वाजता हॉटेल मालवणी हेरिटेज, बाजारपेठ- मालवण येथे आयोजित केली आहे.

या बैठकीत मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सर्व सेल तालुकाध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन्.एस.यु.आय.,ओबोसी विभाग,अल्पसंख्याक विभाग व इतर सेलचे सर्व अध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, माजी जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या सोबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी संबंधित सर्वांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस
तथा मालवण तालुका निवडणूक प्रभारी अरविंद मोंडकर व मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी केले आहे.

You cannot copy content of this page