वेंगुर्ला पेंडूर ग्रा.पं. अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१०-: जिल्हा नियोजन विकास कार्यक्रम अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर गिरोबा मंदिर दुकानवाडी साकव कामाचा लोकार्पण कार्यक्रम सरपंच संतोष गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपसरपंच समिक्षा तांडेल, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रा. पं. सदस्य मिलिंद गावडे, प्रणिता सावंत, सुलोचना परब, ग्रामस्थ उमेश सावंत,सत्यवान तांडेल, कृष्णा गावडे, राजू मेस्त्री, कृष्णा तांडेल, उत्तम चव्हाण, नंदकिशोर चव्हाण, सुलोचना गावडे, देवयानी गावडे, उत्तम गावडे, लिंगेश्वर नाईक, आदित्य मांजरेकर, मानसी मेस्त्री, ग्रा.पं. कर्मचारी वैशाली नाईक, घन:श्याम नाईक, अंकुश गावडे आदी उपस्थित होते. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा २ अंतर्गत एकनाथ तुकाराम नेमन व शंकर कृष्णा गावडे यांचा प्रतिनिधिक स्वरूपात चावी देऊन गृहप्रवेश करण्यात आला.

You cannot copy content of this page