⚡देवगड ता.१०-:
आज रोजी मौजे तारामुंबरी, देवगड येथील बिबट वावर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात आली. या गस्तीत वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे, वनरक्षक मीठबाव आप्पासो राठोड, आर.आर.टी. टीमचे प्रतिनिधी निलेश मोरये व विठ्ठल बीडये, कांदळवन समितीचे अध्यक्ष आण्णा खवळे, प्राणीप्रेमी सुमित कुबल तसेच तारामुंबरीच्या पोलीस पाटील सौ. तन्वी खवळे सहभागी होते.
गस्तीदरम्यान ग्रामस्थांना बिबट्यासह वन्य प्राण्यांपासून घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी दक्षता फलक लावण्यात आले तसेच मार्गदर्शक प्लॅम्पलेट्स ग्रामस्थांमध्ये वाटप करण्यात आले.
देवगड परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाल्यानंतर कांदळवन समितीचे अध्यक्ष आण्णा खवळे व पोलीस पाटील सौ. तन्वी खवळे यांनी तातडीने Forest विभाग कणकवली यांना कळविले. त्यानंतर संबंधित वनविभागाच्या पथकाने पुढील आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
