प्रथम विजेता ₹६,लाख ६६ हजार,६६६ तर मालिकाविरास मोटरसायकल , व इतर बक्षिसे..
⚡देवगड ता.१०-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी आणि जिल्ह्यातील सर्वात महत्वाची म्हणून ओळखली जाणारी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे-नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. क्रिकेटचा महासंग्राम अशी ओळख निर्माण केलेल्या या स्पर्धेला दरवर्षी जिल्हाभरातून तसेच जिल्ह्याबाहेरूनही संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
या वर्षी ही स्पर्धा २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मिठबाव येथील ग्रीन पार्क स्टेडियम येथे रंगणार आहे. डे-नाईट स्वरूपात होणाऱ्या या स्पर्धेमुळे प्रेक्षकांसाठीही ही स्पर्धा खास आकर्षण ठरणार आहे. स्पर्धेत १६ संघांचा सहभाग असून, जोरदार चुरस, उत्कृष्ट फटकेबाजी आणि अचूक गोलंदाजी पाहायला मिळणार आहे.
लाखोंची पारितोषिके, खेळाडूंना मोठे व्यासपीठ स्पर्धेतील विजेत्या संघासाठी ₹६,६६,६६६ रुपयांचे भव्य प्रथम पारितोषिक तर उपविजेत्या संघासाठी ₹३,३३,३३३ रुपयांचे द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय अंतिम सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मालिकावर मोटरसायकल हे खास बक्षीस.
YouTube Live वर थेट प्रक्षेपण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांसाठी ही स्पर्धा आणखी खास ठरणार असून, सर्व सामने YouTube Live द्वारे थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील क्रिकेटप्रेमींनाही या महास्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.
सिंधुदुर्गातील प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा
‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ ही स्पर्धा केवळ क्रिकेट स्पर्धा न राहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृतीचा मानबिंदू बनली आहे. अनेक होतकरू खेळाडूंना या स्पर्धेमुळे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, जिल्ह्यातील क्रिकेटला नवी दिशा देणारी ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹६०,००० इतकी ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी श्री. सुहास मिठबावकर (९४२०२०८०८८), श्री. काका नरे (८०८०३१५४५४) आणि श्री. शशांक फाटक (९४०४१६३५८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी या क्रिकेट सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन रामेश्वर प्रतिष्ठान व मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
