बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण–डांबरीकरण कामाचा शुभारंभ…

⚡देवगड ता.१०-: दाभोळे बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ देवगड मंडल भाजप तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दाभोळे गावातील अनेक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेत गावाच्या विकासाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे.

या विकासकामांमध्ये दाभोळे ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारिकरण करणे, दाभोळे तेलीवाडी ते महाजनवाडी कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, दाभोळे उंबळाची व्हाळीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, दाभोळे राऊतवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे, दाभोळे राऊतवाडी पायवाट दुरुस्त करणे तसेच दाभोळे बौद्धवाडी सड्याकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आदी विविध विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

दाभोळे बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील शासनाचे सेवक प्रदीप कदम यांनी सरपंच श्रीकृष्ण अनभवणे तसेच ग्रामपंचायत अधिकारी शेडगे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत कौतुक केले. अशाच प्रकारे सातत्याने विकासकामे राबवून गावाचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या शुभारंभ प्रसंगी बौद्धवाडीचे ज्येष्ठ सल्लागार भगवान अर्जून कदम यांच्या हस्ते तालुका भाजपाध्यक्ष राजा भूजबळ, सरपंच श्रीकृष्ण अनभवणे तसेच ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल दाभोळकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेडगे, कर्मचारी सागर कुळकर, ग्रामपंचायत सदस्य संदेश चव्हाण, अंगणवाडी सेविका श्रीम. चव्हाण, श्रीम. राऊत, श्रीम. बापट, श्रीम. गवस, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमेश घाडी, माजी अध्यक्ष पांडुरंग घाडी, पोलीस पाटील सानिका कदम, ग्रामस्थ हेमंत कदम, रमाकांत कदम, राज कदम, श्री. कुळकर, श्री. जयराम तेली, साहील दाभोळकर आदी ग्रामस्थ तसेच ठेकेदार उपस्थित होते.

You cannot copy content of this page