सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत मंजूर..
⚡देवगड ता.१०-:
महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय बंदर विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत देवगड–जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी देवगड–जामसंडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहात पार पडले.
या भूमिपूजन कार्यक्रमास माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भूजबळ, उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा उषःकला केळुस्कर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुळ, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले,पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेविका रुचाली पाटकर, आद्या गुमास्ते, स्वरा कावले, मनीषा जामसंडेकर,सौ. नंदिनी कोयघाडी, मृणाली भडसाळे, व्ही. सी. खडपकर, सुभाष धुरी, गणपत गावकर आदींसह बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवगड–जामसंडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, संरक्षक भिंती, पायवाटा, उद्याने, सार्वजनिक सुविधा आदी विविध कामांचा समावेश या मंजूर विकासकामांमध्ये असून, या कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभागनिहाय मंजूर विकासकामे पुढीलप्रमाणे : देवगड–जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड–निपाणी मुख्य रस्ता ते माधव भंडारी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.प्रभाग क्र. 3 जामसंडे खाकशी तिठा ते देवतारी निवास पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे.प्रभाग क्र. 3 प्रभाकर कोयघाडी घर ते मुख्य पायवाट चिरेबंदी बांधणे.
अरुण भडसाळे ते बबन धुरी यांच्या घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे.
भटवाडी रोड आदर्श मराठी शाळा ते आचरेकर घरापर्यंतच्या गटारावर स्लॅब टाकणे.भटवाडी सांगळे घर ते व्हाळापर्यंत बंदिस्त गटार बांधणे व पायवाट काँक्रिटीकरण करणे.प्रभाग क्र. 5 जामसंडे प्रबुद्धनगर येथील लघुनळ योजनेचा चबुतरा बांधणे व पाईप लाईन बदलणे.ग्रा. मा. क्र. १७६ पासून जामसंडे कानखलवाडी ते ग्रा. मा. १७७ ला मिळणारा मार्ग राजेश पराडकर घराजवळ संरक्षक भिंत बांधणे.प्रभाग क्र. 15 जामसंडे विष्णुनगर येथे श्री मोरे घर ते श्री मांडवकर घर पायवाट काँक्रिटीकरण करणे.
प्रभाग क्र. 15 जामसंडे समर्थनगर येथे श्री रामदास भुजबळ ते श्री रविंद्र भुजबळ यांच्या घरापर्यंत पायवाट काँक्रिटीकरण करणे.प्रभाग क्र. 15 जामसंडे विष्णुनगर मुख्य रस्ता ते श्री सुभाष भडसाळे घर पायवाट काँक्रिटीकरण करणे.प्रभाग क्र. 14 धोपटेवाडी विजय धोपटे घराशेजारी विहीर खोदणे व बांधकाम करणे.
प्रभाग क्र. 14 धोपटेवाडी मुख्य रस्त्याकडून रविंद्र ठुकरुळ घर ते भरत भुजबळ घरापर्यंत जाणारा पाणंद रस्ता तयार करणे.प्रभाग क्र. 6 देवगड –जामसंडे टिळकनगर संजय पेडणेकर घर ते शाम कांबळी घर नवीन रस्ता तयार करणे.प्रभाग क्र. 6 टिळकनगर परशुराम लाड घर ते पवार घर अंतर्गत वसाहतीतील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.देवगड–जामसंडे नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. 7 तुळशीकाटे पूर्व येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.प्रभाग क्र. 1 तरवाडी पिंपळपार ते पिरवाडी चव्हाटेश्वर मंदिर रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण करणे.
प्रभाग क्र. 7 जामसंडे सहकारनगर विजय कोयंडे घराशेजारी नगरपंचायत मालकीच्या खुल्या क्षेत्रामध्ये गार्डन तयार करणे.प्रभाग क्र. 8 संजय पराडकर घर ते बी.एस.एन.एल. ऑफिसकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे.प्रभाग क्र. 12 देवगड नेने नगर येथील खुल्या क्षेत्रामध्ये कंपाऊंड व ओपन स्टेज बांधणे.
प्रभाग क्र. 11 संतोष जगताप घर ते महेश चौघुले घर रस्ता तयार करणे.
प्रभाग क्र. 11 दया गावकर घर ते पेंडणेकर घर रस्ता तयार करणे.
प्रभाग क्र. 9 उल्हास जगताप घर ते बांदिवडेकर आईस फॅक्टरीपर्यंत संरक्षक भिंत बांधणे.प्रभाग क्र. 10 किल्ला मराठी शाळा ग्रा. मा. क्र. 141 ते राजा निकम घर सिमेंट रस्ता तयार करणे.उपरकर घर रस्ता ते मेस्त्री घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
प्रभाग क्र. 17 तारामुंबरी मुरमणेवाडी जोशी घरालगत संरक्षक भिंत बांधणे.आदी कामांची भूमिपूजने शनिवारी करण्यात आली.
