वेंगुर्ला तालुक्यातीलपरुळेबाजार ग्रामपंचायतीचा पुणे येथे विशेष सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०९-: यशदा (पुणे) येथे देशपातळीवरील आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत कार्यशाळेत वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी
महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत मधील विविध उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र पंचायतराज विभागामार्फत ग्रामपंचायत परुळेबाजार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्यातील एकूण 14 ग्रामपंचायत सरपंच – ग्रामपंचायत अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.
परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावातील सर्व महिलांचा ग्रामपंचायतीमध्ये सहभाग वाढवून त्यांना रोजगार उपलब्ध त्याची सुरक्षित वातावरण गावात निर्माण करणे व गावातील मुलींना/ बालिका यांना सक्षम करणे अशी प्रत्येक जिल्ह्य़ातून एक ग्रामपंचायत निवड केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत यात निवड झाली आहे. यनिमित्त
यशदा (पुणे) येथे देशपातळीवरील आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
परुळेबाजार ग्रामपंचायत मधील उपक्रमाची माहिती देताना ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी, आतापर्यंत कशाप्रकारे कामे झाली, कशा प्रकारे महिलांचा कसा सहभाग वाढविला, देशात सुध्दा प्रत्येक राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत निवड करून ते आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत बनवुन प्रत्येक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला मार्गदर्शक ठरणार आहे. त्यानुसार परुळेबाजार ग्रामपंचायतीत काथ्या व्यवसाय मधुन 250 ते 300 महिलांना रोजगार निर्माण केला. तालुकास्तरीय प्लास्टिक युनिट चालविण्याचा मक्ता महिला बचतगटामार्फत चालविला जात आहे. महिला बचतगटामार्फत पाणी सोडणे व पाणीपट्टी वसुली करणे व गांङुळखत युनिटमार्फत खत निर्माण करणे, सांडपाणी युनिट, पायपुसणी मशीन उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पंचायत लर्निंग सेंटर परुळेबाजार ग्रामपंचायतीला अनेक जिल्हा परिषद व गावे भेट देत आहेत.त्यावेळेस महिला बचतगटामार्फत स्टाॅल उभारून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तु विक्री होऊन उत्पन्न मिळत आहे. उदबत्ती युनिट करून रोजगार आदर्श महिला बचतगटामार्फत मार्गदर्शन करतात.गावातील शाळा अंगणवाङी ङिजिटल व स्मार्ट टिव्ही, वायफाय सुविधा, शौचालय सुविधा अस्मिता कक्ष, सॅनेटरी पॅङ ङिस्पोज मशीन बसविले. सुरक्षिततेसाठी आपत्कालीन हेल्पक्रमांक बोर्ड गावात लावले आहेत.. सीसीटिव्ही यंत्रणा बसविली आहेत. तसेच गाव अनेमियामुक्त गाव अंतर्गत महिलांचा हिमोग्लोबीन तपासणी करून अनेक उपक्रम राबवत आहेत. महिला बचतगटांना विविध प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. याच उपक्रमाची सविस्तर माहिती यशदा येथील कार्यशाळेत श्री. शिंदे यांनी विस्तृत स्वरूपात दिली.याबाबत परुळेबाजार ग्रामपंचायतीचे जिल्ह्यासह तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page