⚡वेंगुर्ला ता.०९-: आज शुक्रवारी
9 जानेवारी रोजी शहरातील
मदर तेरेसा स्कूल मार्फत वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले दिलीप उर्फ राजन गिरप तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोजा तसेच शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिस्टर लीला, सिस्टर पॅट्रीशिया सिस्टर अनिता उपस्थित होत्या.यावेळी नगरसेविका ऍड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी कथेच्या माध्यमातून एकजुटीने काम कसे करावे व वाचनाचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला तालुक्याचा विकास सर्वजण एकत्र येऊन करू तसेच शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमी तत्पर असू व सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक लीना म्हापणकर, रवींद्र शिरसाट, गौरी माईणकर, प्रितम सावंत, सुहास गवंडळकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, सदानंद गिरप, काजल कुबल, सचिन शेट्ये, संदेश निकम, युवराज जाधव, समीधा रेडकर, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर रिया केरकर आदी नगरसेवक, भाजपा महिला शहर अध्यक्ष, पालक शिक्षक संघांचे श्रेया मयेकर, अश्विनी कोरे, आग्नेल फर्नांडिस, जगदीश सापळे, पूजा गावडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पी. पी. ए. मेम्बर, विद्यार्थी
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सतीश वारंग यांनी व मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी आभार मानले.
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला मार्फत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार…
