आयनोडे ग्रामपंचायतीत विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न…

⚡दोडामार्ग ता.०९-:
आयनोडे (हेवाळे–आयनोडे) ग्रामपंचायतीसाठी महायुतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच साक्षी देसाई व ग्रामस्थांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून निधी मिळाला. कार्यक्रमास भाजप जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, तालुकाध्यक्ष दीपक गवस, तालुका उपाध्यक्ष आनंद तळणकर, तालुका सरचिटणीस सिद्धेश पांगम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, तालुका महिला अध्यक्ष दीक्षा महालकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, सूर्यकांत पर्ने, सरपंच साक्षी देसाई, समीर देसाई, जानकी खानोलकर, ऋषभ देसाई, जयवंतराव देसाई, बापूसाहेब देसाई, भाऊसाहेब देसाई, गोविंद गवस, मधुकर गवस, विकास गवस, स्वप्नील देसाई, अंकुश गावदे, रुपेश गवस, आनंद रेडकर, जनार्दन खानोलकर, उदव जाधव, दयानंद राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page