⚡मालवण ता.०९-:
मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजीकच्या सिद्धिविनायक पटांगण येथे माघी गणेश जयंती उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवानिमित्त बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. धार्मिक विधी, सायं ४ वा. गणेश आगमन मिरवणूक, दि. २२ रोजी सकाळी १० वा. गणेश मूर्तीचे पुजन, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ ८ वा. जंगी भजनबारी सामना (बुवा – श्री. दिनेश वागदेकरे X बुवा श्री. श्रीकांत शिरसाट), दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. महाआरती, सकाळी १० वा. रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ ९ वा. धमाल विनोदी मालवणी नाटक – बाई शिवाय लग्न, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं ७ वा. महाआरती, सायं ७.३० वा. संगीत भजन रात्रौ ९ वा. चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जलवा २०२६, दि. २५ रोजी सकाळी १० वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं. ४.३० वा. हळदी कुंकू समारंभ, सायं.७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ ९ वा. भव्य रेकार्ड डान्स स्पर्धा (कै. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ), दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ ९ वा. जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, दांडेली यांचा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग- दख्खनचा राजा जोतिबा माझा, मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वा. महाआरती, सकाळी ११ वा. सत्यनारायणाची पूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं ७ वा. महाआरती, सायं ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ ९ वा. दत्तमाउली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग- जिव्हेश्वर, दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायं ४ वा. गणेश विर्सजन सोहळा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेकोबा मित्रमंडळ व माघी गणेश उत्सव मंडळ तसेच श्री. संजय लुडबे, सौ. संजीवनी लुडबे व मंदार लुडबे यांनी केले आहे.
