वर्षानुवर्षांची अडचण संपणार; साटेली थोरलेभरड सज्जनवाडीत रस्ते कामांना सुरुवात…

⚡दोडामार्ग ता.०९-: साटेली थोरलेभरड सज्जनवाडी येथे आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या दोन रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास भगवान गवस, संजय गवस, रामदास मेस्त्री, लाडू आयनोडकर, संतोष शेट्ये, साटेली–भेडशी उपसरपंच डिंगणेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसाळ्यात तसेच दैनंदिन ये-जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार दीपकभाई केसरकर यांनी या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार असून ग्रामस्थांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे.
या रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले. भविष्यातही अशा विकासकामांद्वारे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन त्यांनी भूमिपूजनप्रसंगी दिले.

You cannot copy content of this page