संजू परबांचा दणदणीत विजय: धनशक्तीवर जनशक्ती भारी..
⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग 7 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजू उर्फ सच्चिदानंद परब यांनी भाजपचे उमेदवार उदय नाईक यांचा 481 मतांनी पराभव केला आहे. या प्रभागात संजू परब यांच्या पराभवासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते.
परंतु संजू परब यांनी केलेल्या कामामुळे आणि दांडग्या जनसंपर्कामुळे भाजपला धोबीपछाड देत विजय नोंदवला. या प्रभागात विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर करण्यात आला होता.
परंतु, येथील जनतेने धनशक्तीला नाकारत जनशक्तीचा विजय नोंदवला आहे. संजू परब यांच्या या विजयात त्यांच्या पत्नी संजना परब यांनी देखील खंबीर भूमिका पार पाडली असून, त्या देखील स्वतः यावेळी प्रचारात सक्रिय सहभागी झाल्या होत्या. त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन केलेल्या प्रचारामुळेच संजू परब यांना हा आजचा विजय पाहता आला आहे. असे म्हणता येईल.
