शाळेच्या वतीने बँक ऑफ इंडिया चे मानले आभार..
⚡सावंतवाडी ता.१८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं १ शाळेस बँक ऑफ इंडिया शाखा आरोंदा यांच्या वतीने मिक्सर देण्यात आला. याप्रसंगी बँकेचे शाखाधिकारी जॉन डिकूना,रोहित उरकुडे,अक्षय नाईक उपस्थित होते. पांडुरंग नवार यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.यावेळीं शाळेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
शाळेची गरज ओळखून बँकेने केलेल्या सहकार्यामुळे शिक्षकवर्ग व पालकवर्ग यांनी बँकेचे आभार मानले.
यावेळी शाळेचे शिक्षक युवराज गोसावी, बापूशेट कोरगावकर,शिवाजी कवडे उपस्थित होते.
