कोलगावात विकास कामांसाठी निधी हा दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच मंजूर…

भाजपने फुक्याच श्रेय घेऊ नये: उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांची टीका;विकासकामांना कोणताही विरोध नाही, श्रेय स्वार्थासाठी लाटणाऱ्या प्रवृत्तीला विरोध..

⚡सावंतवाडी ता.१७-:
कोलगाव गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपये तसेच जनसुविधा योजनेतून कोलगाव ग्रामसचिवालय बांधकामासाठी २० लाख रुपये असा भरीव निधी स्थानिक आमदार सन्माननीय दीपक केसरकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे.महायुतीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असतानाही, मित्रपक्षाच्या काही स्थानिक पुढाऱ्यांकडून या विकासकामांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोलगाव शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार करण्यात यांनी केला आहे.

ते म्हणाले संबंधित भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार केसरकर यांचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. हा प्रकार आमदारांचा हक्क डावलणारा असून, लोकप्रतिनिधींचा अवमान करणारा असल्याची प्रतिक्रिया यांनी व्यक्त केला आहे.

तसेच कोलगाव ग्रामपंचायतीतील विद्यमान सदस्य, स्थानिक पदाधिकारी यांना देखील या भूमिपूजन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कोलगावातील जनतेची दिशाभूल करून, प्रत्यक्षात निधी मंजूर करून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळून गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप राकेश पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. या निधी संदर्भातील सर्व शासकीय पत्रव्यवहार, पाठपुराव्याचे पुरावे गरज भासल्यास जनतेसमोर सादर करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.महायुतीच्या माध्यमातून कोलगावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील. विकासकामांना कोणताही विरोध नसून, केवळ विकासकामांचे श्रेय स्वार्थासाठी लाटणाऱ्या प्रवृत्तीला विरोध असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या संपूर्ण प्रकाराबाबत कोलगावातील सुज्ञ नागरिकांनी योग्य तो विचार करावा, असे आवाहनही पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page