आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश;सावंतवाडीत आयुर्वेद ओपीडी सुरू…

⚡सावंतवाडी ता.११-: धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे बाह्यरूग्ण तपासणी केंद्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे अशी माहिती आज झालेल्या बैठकीत आयूर्वेद संस्थांनचे संचालक डॉ. प्रजापती यांनी दिली आहे. यासाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केला होता.या संदर्भात स्थानिक आमदार यांचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी श्री.देव्या सुर्याजी यांनी लक्ष वेधले होते. लवकरच हे
केंद्र सावंतवाडीत सुरू होणार आहे.यासाठी संस्थान कडून युध्दपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत यामुळे सिंधुदुर्ग येथील रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानची आयुर्वेद सेवा सावंतवाडीत उपलब्ध झाल्याने आता मोठा फायदा होणार आहे. येथील रूग्णांचा प्रवासाचा त्रास वाचणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना याचा मोफत लाभ घेता येणार आहे. आयुष रुग्णालयाच्या या नवीन ओपीडी सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेद उपचारांसाठी गोव्याला जाण्याची गरज भासणार नाही.लवकरात लवकर सर्व स्टाफ भरुन कायदेशीर करार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. यानंतर त्यांनी तातडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसा प्रस्ताव मंजूर करुन दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थांनचे संचालक डॉ. प्रजापती यांनी दिली असून यावेळी डॉ. सुजाता कदम, डॉ विनायक चकोर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page