तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर..
⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात वेतोरे नं.1 केंद्रशाळेच्या दिशा गोगटे हिने तर माध्यमिक गटात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळेच्या अथर्व मेस्त्री याने सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीला पहिला क्रमांक मिळाला.
येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये 9 आणि 10 डिसेंबर कालावधीत 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे –
विद्यार्थी प्रतिकृती-प्राथमिक गट-प्रथम-दिशा गोगटे (वेतोरे नं.1), द्वितीय-रूद्र माडये (परूळे विद्यामंदिर), तृतीय-समर्थ चोपडेकर (मोचेमाड शाळा), माध्यमिक गट-प्रथम-अथर्व मेस्त्री (परूळे विद्यामंदिर), द्वितीय-लक्ष्मी गावडे (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), तृतीय-अक्षरा शिरोडकर (न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड)
अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य गट – प्राथमिक शिक्षक – प्रथम – अर्चना कोरगांवकर (वेतोरे नं.1), द्वितीय-प्रशांत चिपकर (दाभोली नं.2), तृतीय-शिल्पा मेश्राम (वजराट नं.1), माध्यमिक शिक्षक – प्रथम-चैतन्य सुकी (वेतोरे हायस्कूल), द्वितीय-किशोर सोन्सुरकर (दाभोली हायस्कूल)
दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती-प्राथमिक गट-प्रथम-गौरांग केरकर ( वेतोरे नं.1), माध्यमिक गट-प्रथम-क्लॅटन आराऊज (जी.डी.एन.कॉलेज, वेतोरे)
निबंध स्पर्धा – प्राथमिक गट – प्रथम – वैष्णवी मुणनकर (स.का.पाटील विद्यामंदिर, केळुस), द्वितीय – एकादशी परब (देसाई विद्यामंदिर, परूळे), तृतीय – निहाली कुबल (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), माध्यमिक गट – प्रथम – अस्मिता कुंभार (देसाई विद्यामंदिर, परूळे), द्वितीय – मानसी वराडकर (वेतोरे हायस्कूल), तृतीय – वैभवी चिपकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)
वक्तृत्व स्पर्धा – प्राथमिक गट – प्रथम – श्रुती मराठे (मठ नं.2), द्वितीय-मानसी शेटये (स.का.पाटील विद्यामंदिर, केळुस), तृतीय – प्रांजल परूळेकर (देसाई विद्यामंदिर, परूळे), माध्यमिक गट – प्रथम – श्रावणी आरावंदेकर (वेतोरे हायस्कूल), द्वितीय – दिक्षिता मातोंडकर (मातोंड हायस्कूल), तृतीय – सोहम् अणसूरकर (अणसूर हायस्कूल)
प्रश्नमंजूषा स्पर्धा – प्राथमिक गट – प्रथम – श्रीनिवास मयेकर व अंकुर गावडे (वेंगुर्ला नं.3), द्वितीय-स्नेहा सावंत व कु दिशा गोगटे (वेतोरे नं.1), तृतीय – संस्कृती चिपकर व गाथा कोळंबकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), माध्यमिक गट – प्रथम – दिक्षिता मातोंडकर व काजल परब (न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड), द्वितीय – किर्ती कुंभर व मयुरी गावडे (वेतोरे हायस्कूल), तृतीय – अवंतिका देसाई व विशाखा पंचलिंग (परूळे विद्यामंदिर). या सर्व विजेत्यांना गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, प्रा.डॉ.धनश्री पाटील, वीरधवल परब, किशोर सोन्सुरकर, मुख्याध्यापक सुशांत धुरी हस्ते गौरविण्यात आले.
फोटोओळी – विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
