⚡मालवण ता.०८-:
मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘सुप्रसिध्द साहित्यिक, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्यकृती’ हा विषय स्पर्धेसाठी देण्यात आला आहे.
ही स्पर्धा वय वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना जिल्हा ग्रंथालय कुडाळ येथे दि. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत थेट सहभाग मिळेल.
स्पर्धकांची नावे दि. १० डिसेंबर पर्यंत संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण या ठिकाणी पाठवावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी ९४२२२२४९५० /८३९०६९४३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. उदयराव मोरे यांनी केले आहे.
