थकीत पेन्शन व अंत्योदय योजनेसंदर्भात मांडली कैफियत..
⚡कणकवली ता.०८-: कणकवलीतील दिव्यांग बांधवांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेतली. नोव्हेंबर महिन्याची थकीत पेन्शन तसेच अंत्योदय योजनेबाबतच्या अडचणी यावेळी त्यांनी तहसीलदारांसमोर मांडल्या. या भेटीत UID, आधार लिंकिंग, हयात दाखले आणि उत्पन्न दाखले अद्ययावत करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. काही लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण असूनही पेन्शन न मिळाल्याबाबतही बांधवांनी उपस्थित प्रश्न मांडले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहिती तहसीलदार देशपांडे यांनी दिली.
शासनाच्या प्रणालीमध्ये ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे अद्ययावत आहेत, त्यांची पेन्शन या आठवड्यात खात्यात जमा होईल, असे आश्वासन तहसीलदार देशपांडे यांनी यावेळी दिले.
यावेळी सचिन सादये, बाळू मेस्त्री, यल्लप्पा कट्टीमणी, सुनील सावंत आदी उपस्थित होते.
