प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग ४ मध्ये पूनम चव्हाण यांनी केले जोरदार शक्तिप्रदर्शन…

⚡मालवण,ता.०१-:
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आजच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक चारमधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ पूनम नागेश चव्हाण यांनी प्रभागात रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गेले आठ दहा दिवस या प्रभागात मतदारांचा आपल्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादाच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा दावा पूनम चव्हाण यांनी यावेळी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालवण दौऱ्यानंतर शहरात शिंदे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचे मनोबल कमालीचे वाढले असून त्यांच्यात उत्साह संचारला आहे. गेले दहा दिवस शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली आहे. यात प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार पूनम चव्हाण यांनी या प्रभागात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रभागातील विविध समस्यांची त्यांना जाण त्यांना असून गेल्या दहा वर्षांत त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न पाहता मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने झुकला असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पूनम चव्हाण यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व या प्रभागाला मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आबालवृद्धांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज पूनम चव्हाण यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. मातदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यबाण या निशाणीचे बटन दाबून मतदारांनी आपल्याला विजयी करत आपला हक्काचा नगरसेवक म्हणून निवडून द्यावे असे आवाहन सौ. चव्हाण यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page