मंत्री नितेश राणें: सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.०१-:
“आमचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर सावंतवाडीच्या विकासासाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही. चारही नगरपंचायतींना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी देवा भाऊ आणि मी नेहमी प्रयत्नशील राहू. त्यामुळे जनतेने भरभरून मतदान करून आमच्या उमेदवारांना विजयी करावे,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सावंतवाडी येथे आयोजित प्रचार रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी गाठीभेटी देत नागरिकांशी संवाद साधला.
राणे म्हणाले, “ही निवडणूक नितेश राणेंची किंवा कोणाचे हेवेदावे दाखवण्याची नाही. पुढील पाच वर्षे सावंतवाडीचे भविष्य घडवण्याची ही निवडणूक आहे. म्हणूनच आम्ही मतदारांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून मतांची विनंती करत आहोत. आम्हाला जनतेच्या आशीर्वादाचा पूर्ण विश्वास आहे. तीन तारखेनंतर आमचे सर्व उमेदवार कामाला लागतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
