⚡ सावंतवाडी ता.३०-: अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, आपली भूमिका मांडत आहेत. “मला एक संधी द्या, शहर सेवेसाठी मी कटिबद्ध आहे,” अशी विनंती त्या नागरिकांना करत आहेत.
शहरात सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करत “मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्या नागरिकांशी संवाद साधताना म्हणाल्या. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी निदर्शनास आले.
