⚡सावंतवाडी ता.३०-: पडवे–माजगाव शाळेच्या निवृत्त पदवीधर शिक्षिका सौ. सुजाता संदीप गवस यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मानवी मूल्यांचं भांडार देत आपल्या सेवेला एक वेगळीच उंची दिली. याच सेवेचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पणदूर येथील ‘संविता आश्रम, ला एक दिवसाचं अन्नदान व वस्त्रदानाचं सत्कर्म करून आपल्या सेवाभावाची परंपरा जपली.
जीवनभर शिक्षणाच्या माध्यमातून उजेड पेरणाऱ्या या करुणामयी शिक्षिकेचा निवृत्तीचा हा क्षण म्हणजे एका अध्यायाचा समारोप नाही, तर ‘सेवा आणि दयेच्या परंपरेचा’ अधिक उजळ आरंभ आहे. त्यांच्या आश्रमातील या सेवाभावाने सर्व निराधार भारावून गेले. सविता आश्रम मध्ये आपली सेवा अर्पण केल्याबद्दल सविता आश्रमचे संदीप परब यांनी सौ सुजाता संदीप गवस यांचे आभार मानले.
सौ .सुजाता संदिप गवस यांचा संविता आश्रमास मदतीचा हात…
