⚡बांदा ता.३०-: दोडामार्ग ते माणगांव श्री टेंबे स्वामींच्या पालखी पदयात्रेला शुक्रवार दिनांक 28 पासून आरंभ झाला असून मार्गात जागोजागी त्यांचे स्वागत केले जात आहे. यंदाचे या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून प्रतिवर्षी या पदयात्रेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे.
शनिवारी पहाटे गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान झाले. मार्गात
सासोली ,कळणे ,आडाळी, डेगवे येथील भाविकांनी पालखीचे स्वागत, पुजन, अल्पोपहार, महाप्रसाद आदी सेवा केली.
सायंकाळी ५.३० वा. संत सोहिरोबानाथ आंबिये मठ, बांदा येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी पूजन ,आरती झाली. चहापानानंतर पालखीचे प्रस्थान झाले.पुढे दत्तमंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व पुजन, संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे पालखी पूजन, आरती,महाप्रसाद रात्रौ भजन सेवा व पालखी मुक्काम . रविवार दि. ३० नोव्हेंबर पहाटे ५.०० वा. आरती, पालखी पूजन व माणगांवकडे पालखी प्रस्थान असा नियोजित कार्यक्रम आहे.
फोटो:-
बांदा संत सोहिरोबानाथ आंबिये मठात पालखीचे पूजन व आरती करताना भाविक व पदयात्री.
दोडामार्ग-माणगाव पालखी पदयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
