सावंतवाडीत सायंकाळी ठाकरे शिवसेनेची प्रचार फेरी…

माजी खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती: ठाकरे शिवसेनेने घेतली प्रचारात आघाडी..

⚡ सावंतवाडी ता.२९-:
सावंतवाडी शहरात ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराने जोरदार वेग पकडला असून आज सायंकाळी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शहरात भव्य प्रचार फेरी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राऊत हे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबत पक्षाच्या भूमिका मांडणार आहेत.

नगरपालिका निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाकरे शिवसेनेने प्रचाराला मोठे गतीमान दिले आहे. नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक उंचावत आहे. या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, “तीन तारखेला आमचा विजय नक्की” असा दावा देखील करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page