बबन साळगावकर:भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल तर चांगल्या लोकांना निवडून द्या…
⚡सावंतवाडी ता.२५-: रवींद्र चव्हाण यांनी माझा पक्षप्रवेश करून घेतला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असे मत ज्येष्ठ नेते बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना मिळत असलेला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
साळगावकर म्हणाले, सावंतवाडी भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल तर चांगल्या लोकांना निवडून द्या. शहराच्या विकासासाठी सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जाहीरनाम्यातील सर्व मुद्दे निवडून आल्यावर पूर्णत्वास नेऊ, अशी हमीही साळगावकर यांनी यावेळी दिली. आगामी निवडणुकीत मतदारांनी सकारात्मक बदलासाठी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी सावंतवाडीकरांना केले.
