शहर विकास आघाडीच्या रूपाने एक संधी कणकवलीकरांनी मला द्यावी…

आमदार निलेश राणे यांचे आवाहन:कणकवलीत संदेश पारकर यांच्या विजयासाठी माझा गुलाल घेऊन येणार..

कणकवली :
लोकांची कामे सहज झाली पाहिजेत.एक संधी कणकवली शहरातील जनतेने मला द्यावी.या लोकांनी गेल्या दहा वर्षांत काय केलं ? आता विकास करू.असे सांगताहेत.तेव्हा का नाही केलं ? ते आता काय करणार ? एकवेळ संधी द्या,कामे न झाल्यास पुन्हा तोड दाखवणार नाही.नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.वाटेल तेवढा निधी कणकवली शहराच्या विकासासाठी आणणार असा विश्वास शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडली.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर,माजी राजन तेली,उपनेते संजय आग्रे,ठाकरे शिवसेना विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत,काँग्रेस उपाध्यक्ष नागेश मोरये,युवा नेते प्रथमेश तेली,सुभाष गोवेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर,उपजिल्हाप्रमुख संदीप कदम,रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेश मोरे व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

कणकवली शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजेत.आघाडी तयार करताना अनेक अडचणी झाल्या.कणकवलीची सेवा कारणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.नगरपंचायत मध्ये सर्व सामान्य माणूस भयमुक्त गेला पाहिजे.ते केबिनमध्ये गेल्यानंतर खिशात हात घालून पैसे मोजता गामा नये. एका दिवसात दाखले हे लोकांना मिळाले पाहीजेत.पैशाच्या जोरावर नको, तर आशिर्वादाने ही सत्ता मिळाली पाहिजे.असे ते म्हणाले.
आ.निलेश राणे म्हणाले, इथे चर्चा काय? शेवटच्या टप्प्यात कोणाला किती मिळणार? याची आहे. एक पिढी बरबाद झाली,आता पुढची पिढी बाद घालवायची आहे का? संदेश पारकर आणि माझ्याबद्दल अफवा करतील,शेवटच्या दिवशी काहीही होईल,पण विश्वास ठेवू नका. कारण मी त्यांच्यासोबतच होतो.कुठे प्रिंटिंग होते हे मला माहीत आहे. कुठल्या तारखेला काय होणार ? हे सगळे मला माहीत आहेत. चुकीचे झाल्यास 5 वर्षे फुकट जाणार आहेत,हे कणकवलीकरांनी लक्षात ठेवावे.समाजाने कोणाला बाजूला केले की, तोच माणूस पुनः चांगले काम करुन दाखवतो.
मतदारांच्या यादीत हे काय चालले आहे? मी तक्रार केली होती निवडणूक आयोगाकडे केली होती. तुम्ही आयोगाला माहिती दिली का?.तुम्ही आम्हाला धमकी देता का? मी कुठल्याही पदावर नसताना आमदार,खासदार यांना अंगावर घेतले.तुम्ही कोण? संदेश पारकर यांना एकदा संधी द्यायला पाहिजे.असे आवाहन केले.

You cannot copy content of this page