विलास जाधव: प्रभाग क्रमांक दहा मध्ये अँड अनिल निरवडेकर व विना जाधव यांनी घेतली प्रचारात आघाडी..
⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून यासाठी जनतेने आम्हाला एकदा संधी द्यावी. आम्ही दिलेली प्रत्येक वचनं पूर्ण करू, असा ठाम विश्वास माजी नगरसेवक विलास जाधव यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक १० मधील प्रचारादरम्यान ते बोलत होते.
जाधव म्हणाले की, जनतेमध्ये जात असताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वतःहून आमच्या सोबत येत आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष मोठ्या मतांनी विजयी होतील याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे अनेक रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यास गती मिळणार असून, ही सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रचार मोहिमेत अॅड. अनिल निरवडेकर व विना जाधव यांनी आघाडी घेत सक्रिय सहभाग नोंदवला.
