बबन साळगावकर यांची घोषणा:सावंतवाडी हे भयमुक्त शहर आहे आणि ते तसेच भयमुक्त ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार..
⚡सावंतवाडी ता.२३-: भाजपची सत्ता पुन्हा आल्यास येत्या जानेवारी महिन्यात सावंतवाडीत भव्य पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते बबन साळगावकर यांनी केली. आम्ही विकासकामांवर निवडणूक लढवत आहोत आणि नागरिकांना दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साळगावकर म्हणाले, “आम्ही कोणावरही टीका करणार नाही. कामाला प्राधान्य देणारी राजकारणाची आमची भूमिका आहे.” नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले या काम करणाऱ्या, अभ्यासू व सकारात्मक नेतृत्व गुण असलेल्या महिला आहेत. शहरातील प्रत्येक भागात त्यांचे होत असलेले उत्स्फूर्त स्वागत पाहता इतर उमेदवार खूप मागे पडले असून भाजपाचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना साळगावकर म्हणाले, “येणारे पाच वर्ष आम्हाला नगरपालिका अधिक सक्षम व सुबक पद्धतीने चालवायची आहे. सावंतवाडी हे भयमुक्त शहर आहे आणि ते तसेच भयमुक्त ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.”
