शासनातर्फे होणार मोफत ऑपरेशन आणि उपचार..
⚡ओरोस ता २२-: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार असलेल्या ५० मुलांची यशस्वी तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार प्रवर्गातील मुलांचे तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा महिला बाल रुग्णालय कुडाळ येथे करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या शिबिराला एम एम आर हॉस्पिटल, ठाणे, मुंबई येथील तज्ज्ञ आणि टीम उपस्थित होते.
या शिबीरा मध्ये एकूण 50 लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी अनेक लाभार्थी औषधोपचार व लाभार्थी शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या रूग्णालयात मोफत उपचार करणेत येणार आहेत.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील वैद्यकिय अधीक्षक डॉ संजय वाळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग, इनचार्ज सिस्टर श्रीम गावित व श्रीम गोसावी आणि कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य लाभले. या शिबिरास निलेश गावडे, डॉ रोहन साळुंखे, राजेश पारधी, विश्वनाथ राव, एकता वराडकर आणि आरबीएसके टीम, डी ई आय सी टीम उपस्थित होते.
फोटो ओळ: कुडाळ:
