नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली…

⚡सावंतवाडी ता.२१-: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली असून एकुण ८ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

आज गौरव जाधव, नासीर शेख, राधिका चितारी, अस्मिता परब, जावेद शहा, शबाब शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ही माहिती दिली. प्रभाग क्रमांक १ ब मधून नासिर शेख, जावेद शहा, शबाब शेख यांनी दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
अर्चित पोकळे यांनी प्रभाग क्रमांक ६ ब मधून दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. श्री पोकळे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या शब्दांचा आदर ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गौरव जाधव यांनी प्रभाग ९ ब मधून, अस्मिता परब प्रभाग ७ अ तर राधिका चितारी यांनी प्रभाग ३ अ मधून माघार घेतली आहे‌.

You cannot copy content of this page