प्रभाग क्रमांक 6 मध्ये केला जोरदार प्रचार: नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद..
सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीतील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर माजी मंत्री दीपक केसरकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार यांच्यासाठी त्यांनी आज जोरदार प्रचारफेरी घेतली.
प्रचारादरम्यान नागरिकांनी केसरकर यांचे स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरातील मतदारांशी संवाद साधत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या उपस्थितीमुळे शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
