सावंतवाडीत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा भाजप उमेदवारांना सक्रिय पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२१-:
सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची भेट घेतली.

या भेटीवेळी कर्मचाऱ्यांनी भाजपच्या नगराध्यक्षसह सर्व नगरसेवक उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या या भूमिकेमुळे भाजपला सावंतवाडीमध्ये आणखी बळ मिळाल्याची भावना व्यक्त करताना सुधीर आडीवरेकर म्हणाले की, “कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा भाजपच्या विजयाला अधिक मजबूत करणारा आहे.”

You cannot copy content of this page