प्रभाग क्रमांक तीन मधील आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताने निवडून येतील…

संजू परब: शेवटच्या 27 व 28 तारखेला प्रभाग तीन मध्ये मी ठाण मांडून बसणार..

⚡सावंतवाडी, ता. २०-: “समोर कोण उमेदवार आहे याकडे पाहण्यापेक्षा आपला विजय कसा निश्चित करता येईल, यासाठी काम करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे मत शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक तीनमधील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.

परब म्हणाले की, शहरात आमदार दीपक केसरकर यांनी केलेला व्यापक विकास सर्वांसमोर आहे. या विकासकार्यातून प्रेरित होऊन प्रभाग क्रमांक तीनमधील दोन्ही उमेदवारांना, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. प्रभाग क्रमांक तीन हा या विजयात निर्णायक ठरणार आहे,” असे परब यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी आगामी २७ आणि २८ तारखेला प्रभागातील परमिट बूथवर स्वतः उपस्थित राहून मतदारांच्या संपर्कात राहणार असल्याची माहितीही दिली.

You cannot copy content of this page