निवडणूक खर्च नोंदणीसाठी सावंतवाडीत उमेदवारांना मार्गदर्शन…

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्ष व नगरपरिषद सदस्य पदासाठीचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा तपशिल सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या निर्देशानुसार नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या प्रशिक्षणास उपस्थित नगराध्यक्ष व सदस्य पदाचे उमेदवार, तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना मंदार पटवर्धन, उपकोषागार अधिकारी, सावंतवाडी आणि प्रसाद बटवाल, लेखापाल, सावंतवाडी नगरपरिषद यांनी निवडणूकीसाठी येणा-या जमाखर्चाचा हिशोब आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विहीत नमुन्यामध्ये सादर करणेसाठी व त्याबाबत उमेदवार व प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांबाबत निरसन केले. यावेळी उमेदवार तसेच उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते

You cannot copy content of this page