भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गौरव जाधव यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१८-: भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गौरव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना गौरव जाधव म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत युवा मोर्चाची संघटना अधिक बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार राहणार असल्याच त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बबन साळगावकर, संदीप गावडे, मनोज नाईक, आनंद नेवगी, मंदार कल्याणकर, विलास जाधव, अँड.अनिल निरवडेकर, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page