कुडाळ : श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 9.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
याबारीसाठी बुवा श्री.विनोद चव्हाण श्री.लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी तालुका कुडाळ कै. चिंतामणी पांचाळ यांचे पट्ट शिष्य विरुद्ध बुवा श्री.विजय उर्फ गुंडू सावंत श्री.हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे बुवा श्री.अशोक सावंत यांचे पट्ट शिष्य विरुद्ध बुवा श्री.संदीप लोके वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ गुरुवर्य बुवा श्री.विजय परब यांचे पट्ट शिष्य या तीन बुवांमध्ये जंगी तिरंगी भजनांचा सामना होणार आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ उद्योजक श्री रुपेश पावसकर यांनी केले आहे.
