भाजपची सावंतवाडीत जोरदार प्रचार मोहीम सुरू…

पालकमंत्री नितेश राणे, युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून आखण्यात आली प्रचाराची रणनीती;नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला गती..

⚡सावंतवाडी ता.१८-: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरात जोरदार प्रचार मोहीम राबविली आहे. विविध प्रभागांत पथनाट्य, भव्य प्रचारफेऱ्या तसेच घरदार संपर्काच्या माध्यमातून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे.पालकमंत्री नितेश राणे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून प्रचाराची रणनीती आखण्यात आली आहे.

विशेषत्वाने, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे फोटो लावलेला एक विशेष प्रचार टेम्पो शहरभर फिरत असून, या माध्यमातून पक्षाने आपली निवडणूक रणनीती अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे स्थानिक राजकारणाला चांगलीच रंगत आली असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरात सर्वत्र निवडणुकीची चर्चा रंगत असून नागरिकांचे लक्ष आता पुढील प्रचारातील हालचालींकडे लागले आहे.

You cannot copy content of this page