खोदाई बाबत चौके ग्रामपंचायतीला कल्पना न दिल्याने चौके सरपंच आक्रमक..
⚡मालवण ता.१८-:
मालवण तालुक्यात सदया भूमिगत विद्युत वाहिनीचे काम जोरदार सुरू आहे यात अनुषंगाने 33 केव्ही पेंडुर ते कुंभारमाठ भूमिगत वाहिनीचे काम महामार्गानजीक खोदाई करून चालू असून चौके भराडी मंदिर पर्यंत खोदाई पूर्ण झाली यावेळी पुढे खोदाई करताना चौके ग्रामपंचायत यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता पुढे खोदाई चालू केली याबाबत सरपंच आणि ग्रामस्थ आक्रमक होवून सदर चालू काम बंद करून ठेकेदाराला धारेवर धरले..
चौके गावाला गेली 40 वर्षे साळेल-नांगरभट या गावातून सुमारे 3 किलोमिटर वरून नळपाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा होत आहे. पूर्णतः चौके गाव याच योजनेवर अवलंबून आहे. सतत नळपाणी योजनेची पाईपलाईन साळेल ते चौके रस्त्यालगत असून आता या भूमिगत वीज वाहिनीची लाईनही याच मार्गाने टाकण्यात येत आहे.. ११ नोव्हेंबरला साळेल येथे वीज वाहिनी ची खोदाई करताना चौके नळपाणी योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली गेली त्यामुळे चौके भराडी आईच्या जत्रोत्सवाच्या कालावधीत तीन दिवस गावात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तीन दिवस सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला याचवेळी सरपंच पी.के.चौकेकर यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना पुढील खोदाई बाबत कल्पना दिली होती. मात्र ठेकेदारांने गावातील ग्रामस्थांच्या कोणताही विचार न करता भूमिगत वीज वाहिनीचे काम चालू ठेवले यात पुन्हा नळपाणी योजनेनी पाईपलाईन फुटल्याने सरपंच ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
गेला महिनाभर महामार्गानजीक पेंडूर ते कुभांरमाठ भूमिगत 33 केव्ही विद्युत वाहिनीचे खोदाई करून वीजलाईन टाकण्याचे काम जोरदार चालू आहे यासाठी कसाल मालवण मुख्य रस्त्या नजीक जेसीबी मशीन तसेच कामगारांच्या सहाय्याने खोदाई होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खोदलेली माती रस्त्यावर येत आहे तसेच विद्युत वाहिनी टाकून झाल्यावर वरच्यावर माती उजवली जात आहे यामुळे रस्त्या नजीकची साईट पट्टी पूर्णतः धोकादायक बनली आहे. मोठ्या गाड्यांना साईट देताना वाहन चालकांची मोठी दमच्याक होते काम करताना ठेकेदाराकडून कोणतेही सुरक्षितता घेतली जात नसल्याचे दिसून येते.या खुदाईमुळे रस्त्यावर पडलेली माती व साईड पट्टी अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे.
भूमिगत विद्युत लाईनच्या खोदामुळे मालवण करताना रस्त्यावरील अनेक जुन्या मोऱ्या मातीने उजल्या गेल्या आहेत व या मोऱ्यचे बांधकाम कमकुवत झाल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत भविष्यात अपघात झाल्यास या खात्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भूमिगत विद्युत लाईनची खोदाई करताना संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित नसतात असेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे..
